Breaking News

वाढदिवसानिमित कोप्रोली येथे गरजूंना चादर, चटईचे वाटप

उरण : वार्ताहर

भाजपचे नेते तथा जेएनपीटी कामगार नेते हेमंत भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी (दि. 20) उरण तालुक्यातील कोप्रोली येथे गरीब गरजू बांधवांना चटई व चादरीचे वाटप करण्यात आले. या वेळी शिक्षक नेते निर्भय म्हात्रे, बबन पाटील, प्रदीप घरत, रवींद्र तांडेल, रमणिक म्हात्रे, शाळा कमिटी अध्यक्ष लाखन पाटील व परिवार उपस्थित होते. हेमंत भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, जितेंद्र घरत, नवघरचे माजी सरपंच, शेखर तांडेल, पाणजे गावचे माजी सरपंच मच्छिंद्र पाटील, जितेंद्र पाटील, सोनारी ग्राम सुधारणा अध्यक्ष दिनेश रमण पाटील, जेएनपीटीचे माजी विश्वस्त रवी पाटील, जेएनपीटी वर्कस युनियनचे सर्व पदाधिकारी, जेएनपीटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सदस्य आदींनी हेमंत भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply