कर्जत : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजपचे शहर अध्यक्ष बळवंत घुमरे व महिला मोर्चाच्या जिल्हा चिटणीस बिनीता घुमरे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील उपजिल्हा रुग्णालयामधील कोविड रुग्णांसाठी वाफ घेण्याच्या मशीनचे वाटप करण्यात आले.
भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, चिटणीस रमेश मुंढे, मंदार मेहेंदळें, सुनील गोगटे, सरस्वती चौधरी, सूर्यकांत गुप्ता, विजय जिनगरे, मारुती जगताप, मिलिंद खंडागळे, विशाल सुर्वे, गणेश गवई, सर्वेश गोगटे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे, डॉ. गोरे या वेळी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper