महाड : प्रतिनिधी
वारस नोंद करण्यासाठी पैशाची मागणी करणार्या महिला तलाठीवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. 7) दुपारी सापळा रचून कारवाई केली. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड तालुक्यातील तळोशी गावाच्या हद्दीतील सर्वे नंबर 23/4, 24/13, 25/1, 31/5, 47/14, 32/4, 25/18 तर नांदगाव खुर्द येथील सर्व्हे नंबर 182, 197, 80 या वडिलोपार्जित शेतजमिनीमध्ये वारस नोंद करण्याकरीता 6000 रुपयांची मागणी तलाठी शिल्पा पवार यांनी केली. याबाबत शरद दत्ताराम चव्हाण (रा. नालासोपारा) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी बुधवारी दुपारी 12:40 वा. सापळा रचून ही कारवाई केली. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988चे कलम 7 व 7 (अ)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper