मुरूड ः प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे वाल्मिकी नागरी सहकारी पतपेढी मजगाव येथे वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक उपक्रम तसेच आदिवासी लोकांच्या योजना घरोघरी पोहचविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला.
शालेय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रगतीबद्दल पतसंस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले. वाल्मिकी महाराजांचे कार्य विषद करण्यात आले. विविध उपक्रम राबविण्यात येऊन ही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वाल्मिकी महाराजांच्या तसबिरीला अध्यक्ष कृष्णा अंबाजी यांनी पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमासाठी वाल्मिकी पतसंस्थेचे अध्यक्ष कृष्णा अंबाजी, संतोष बुल्लू, नरसिंह मानाजी, मधुकर भोईनकर, कुमार गोसावी, सुजाता बुल्लू, विनायक मानाजी, संदीप गोसावी, संतोष जमनू, रेणुका बुल्लू, दीपक फळेभाई, निलेश बिरवाडकर, प्रियंका मानाजी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper