Breaking News

वावोशी परिसरात दोन घरफोड्या; सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील वावोशी फाटा येथे दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या असून, त्यात अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व 35 हजार रोख रक्कम तसेच पार्लरचे सामान चोरुन पोबारा केला.

वावोशी फाटा येथील राजेंद्र जाधव आणि त्यांचे कुटुंबीय गावी गेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच सुमारे 35 हजार रोकड  चोरून नेली. सोमवारी दुपारी जाधव कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्याच शेजारी राहणारे भगवान शांताराम इंगळे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी   घरातील पार्लरचे सामान आणि काही किरकोळ रक्कम चोरून नेली.

घोडीवली गावात चोरी

खालापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील घोडीवली गावातील एका घराच्या मागच्या बाजूचा दरवाजा उघडून चोरट्याने कपाटातील सुमारे चार लाखाचा ऐवज घेऊन पोबारा केला.

मनोहर गोटीराम काठवले (रा. घोडीवली, ता. खालापूर) हे त्यांच्या घरात सोमवारी रात्री झोपले होते.  दरम्यान, पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराचा मागच्या दार उघडून घरात प्रवेश केला. व बेडरूममधील    कपाटातील सोन्याचे दागिने व रोख 40 हजार असा सुमारे चार लाखाचा ऐवज चोरुन नेला. सकाळी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनोहर काठवले यांनी खालापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पुढील तपास सुरू आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply