Breaking News

वाशिवली डोंगराळ भागात गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिवली डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रसायनी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे.

या कारवाईत बेवारस स्थितीत मिळून आलेले 200 लिटर क्षमतेची दोन पत्र्याच्या टाकीमध्ये तांबड्या रंगाचे उग्र वास येत असलेले एकूण 200 लिटर रसायन मिळून आले. हे रसायन जागीच ओतून नाश करून नष्ट करण्यात आले व पत्र्याची टाकी तोडून नुकसान करण्यात आले.

रसायनी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक पदाचा कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी कार्यभार सांभाळताच गैरकायदा हातभट्टी अड्डे उद्ध्वस्त करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. गेल्या चार महिन्यांचा कालावधीत ही आठवी घटना असून वाशिवली डोंगराळ भागात गैरकायदा हातभट्टीवर छापा टाकण्याची सहावी वेळ आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply