नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
वाशीतील खासगी रुग्णालयातील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आता समोर आले आहे. हा मृत्यू 24 तारखेला झालेला होता, मात्र या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल येणे बाकी होते. गुरुवारी (दि. 26) आलेल्या या रिपोर्टमध्ये ही 65 वर्षीय महिला पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित नागरिकांच्या मृत्यूचा आकडा चारवर गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गोवंडीतील ही महिला नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल होती. त्यानंतर तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिची कोरोना टेस्ट केली गेली होती. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. आता ही महिला कुणाच्या संपर्कात होती, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper