पनवेल : वार्ताहर
वाहनचालकांचे वाहतुक नियमांबाबत प्रबोधन व्हावे याकरीता भुषण उपाध्याय सो . अप्पर पोलीस महासंचालक वाहतुक महाराष्ट्र राज्य मुंबई, यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे विजय पाटील, पोलीस अधीक्षक (मुख्यालय) व डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सुदाम पाचोरकर पोलीस निरीक्षक महामार्ग पनवेल व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचे मार्फत खालापुर टोलनाका येथे वाहनचालकांना फेसमास्क व सॅनिटायझर्स चे वाटप करण्यात आले.
तसेच वाहतुक नियमांबाबतच्या माहितीबाबतची पत्रके वाटप करीत वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होणार्या अपघाताबाबत माहिती देवुन अपघातसमयी मदत करण्याबाबत सुचना दिल्या तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास करण्यात येणार्या दंडात्मक कारवाईबाबतची माहीती देवुन वाहनचालकांचे मोठया प्रमाणात प्रबोधन करण्यात आले.
या वेळी पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, पोलीस उपनिरीक्षक काकडे व पोलीस कर्मचारी स्टाफ हजर होते, असे महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper