खारघर : रामप्रहर वृत्त
खारघरमधील विविध गृहसंकुलांमधील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. या वेळी त्यांनी विकासकामांचा प्रवाह अविरतपणे सुरू राहील, अशी ग्वाही दिली. पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आणि पनवेल महापालिकेमार्फत खारघरमधील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.
यामध्ये वास्तुविहार केएच 1 आणि केएच 2, पारिजात केएच 2, घरकुल ए विंग महालक्ष्मी सोसायटी, घरकुल बी विंग कुंजविहार, स्पेगेटी इएफ प्रियदर्शनी सोसायटी, स्पेगेटी एचआय पारिजात सोसायटी, स्पेगेटी जेकेएलएम सोसायटी तसेच वास्तुविहार सेक्टर 16 येथील आरे डेरीपासून साई गणेश मंदिरापर्यंतचा रस्ता, केएच /2 मागील गेटपासून केपीसी स्कूलपर्यंतचा रस्ता आणि सेक्टर 17 मधील दामोदर प्रिया बिल्डिंगपासून सेलिब्रेशन सोसायटीच्या मागील रस्त्याचा समावेश आहे.
माजी नगरसेविका संजना समीर कदम यांच्या पाठपुराव्यामुळे या कामांना मंजुरी मिळाली आहे.
या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भारतीय जनता पक्ष आणि पनवेल महानगरपालिका नागरिकांना अधिक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी भारतीय जनता पक्षााची ताकद नागरिकांना सुविधा देण्यासाठी उपयोगात येत असून, नागरिकांच्या अपेक्षित असलेली सर्व कामे लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला.
या भूमिपूजन कार्यक्रमाला माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, नरेश ठाकूर, अभिमन्यू पाटील, निलेश बाविस्कर, माजी नगरसेविका संजना समीर कदम, रायगड जिल्हा सचिव कीर्ती नवघरे, खारघर मंडल उपाध्यक्ष किरण पाटील, युवा नेते समीर कदम, अमर उपाध्याय, संदीप माघाडे, अजित अडसुळे, कल्पेश तोडेकर, संतोष शर्मा, प्रभाग अध्यक्ष युवा मोर्चा सुशांत पाटोळे, प्रथमेश मोरे, सर्जेराव मेंगाने, प्रणय मोरे, विश्वनाथ इंडी, रावसाहेब आभाळे, मुकेश गर्ग, राजू आचलकर, महेश हिनुकले, अमित बोदाई, संजय शर्मा, अनिल बोरे, स्नेहल बोधाई, सुनील येवले, सोनू सूर्यवंशी, साहिल कोळी, महेंद्र कांबळे, सुधीर सावंत, आशा मोरे, प्रकाश ओव्हाळ, तसेच सोसायट्यांचे अध्यक्ष, सचिव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी केक कापून परेश ठाकूर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper