पनवेल : रामप्रहर वृत्त
विचुंबे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक बुधवारी (दि. 17) झाली. या वेळी प्रमोद शांताराम भिंगारकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याबद्दल भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित उपसरपंच भिंगारकर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, सरपंच नम्रता पाटील, ग्रामविकास अधिकारी के. सी. चवरकर, महेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजेश पाटील, आत्माराम पाटील, प्रमोद भगत, भाजप विचुंबे गाव अध्यक्ष के. सी. पाटील, सल्लागार नितीन भोईर, माजी सरपंच व सदस्य किशोर सुरते, रवींद्र भोईर, अमिता म्हात्रे, अक्षता गायकवाड, नविता भोईर, संगीता भोईर, प्रमिला म्हात्रे, प्राजक्ता भोईर, माजी सरपंच संजय म्हात्रे, बळीराम पाटील, राम म्हात्रे, भरत पाटील, अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष अविनाश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अनिल भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper