पनवेल ः रामप्रहर वृत्त
देशाच्या स्वातंत्र्यापासून सैनिक, खेळाडू आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी देशाचा मान राखला आणि वाढवला आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी बुधवारी (दि. 13) विचुंबे येथे आयोजित तिरंगा पदयात्रेत केले.
भाजप पनवेल तालुका पूर्व मंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, माजी जि.प.चे माजी सदस्य राजेंद्र पाटील, अमित जाधव, धनराज विसपुते, एकनाथ देशेकर, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पनवेल तालुका पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, सरपंच प्रमोद भिंगारकर, उपसरपंच साधना वाघमारे, आनंद ढवळे, बळीराम पाटील, कमला देशेकर, संदीप वाघमारे, गुरूनाथ म्हात्रे, यतीन पाटील, युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, श्रावणी भोईर, अनंता गायकवाड, चेतन भिंगारकर, प्रगती गोंधळी, किशोर सुरते, अविनाश गायकवाड, अनिल भोईर, आनंद गोधळी, चेतन सुरते, धनंजय भोईर, महेश भिंगारकर, स्वाती पाटील, निलेश वाघमारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदयात्रेदरम्यान देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
विचुंबे येथील डी.डी. विसपुते कॉलेजपासून सुरू झालेली ही पदयात्रा ग्रीन व्हॅली बिल्डिंग, शिवम सोसायटी, ग्रामपंचायत कार्यालय, विचुंबे गाव, वरची आळी आणि मरीआई मंदिरापर्यंत मार्गक्रमण करून देवद येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या परिसरात सांगता झाली.
या वेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यापासून सैनिकांनी सीमेवर लढून देशाचे रक्षण केले आहे. खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा मान वाढवला आहे, तर विविध क्षेत्रांतील व्यक्ती आणि नागरिकांनीही देशाच्या प्रगतीत योगदान दिले आहे. येत्या स्वातंत्र्य दिनी घरोघरी तिरंगा फडकवून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper