पनवेल : रामप्रहर वृत्त
विद्यार्थ्यांनी आपण ज्या क्षेत्रात शिक्षण घेत आहोत, त्या ठिकाणी अभ्यासाला सर्वोच्च महत्त्व दिले पाहिजे, कारण हा महत्त्वाचा काळ परत येत नाही. त्यांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिक्षण घेण्याचा आग्रह करत, या स्पर्धेच्या युगात आपली हुशारी दाखवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खारघर येथे विद्यार्थी सत्कार समारंभावेळी केले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन कार्यक्रम रविवारी खारघरमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा अजित अडसुळ आणि खारघर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या उषा अडसुळ यांनी खारघर सेक्टर 15 मधील विबग्योर हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते झाले. या वेळी त्यांच्या हस्ते 10 वी आणि 12 वीच्या परिक्षेत उज्लव यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि स्मार्टवॉच देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच डिंपल चौधरी या विद्यार्थीनीने तासाभरात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे तैलीचीत्र काढले असून या चित्राचे प्रकाशनदेखील त्यांच्या हस्ते झाले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मार्गदर्शन कराताना म्हणाले की, मेहनत आणि कष्ट हे महत्वाचे आहे. ज्या क्षेत्रातही शिक्षण घेत असाल या ठिकाणी अभ्यासाल महत्व द्या ही वेळ परत येत नाही. जेवढ शिक्षण घेता येईल तेवढ घ्या. विद्यार्थ्यांनी आपली हुशारी दाखवणे महत्वाचे आहे. सध्या स्पर्धेचे युग आहे. तुम्ही आतापर्यंत चांगल काम केले आहे यश चांगले मिळवले आहे. त्याच्या पुढील काळात यश मिळवण्यसाठी सज्ज रहा सतत मेहनत करा, असा सल्ला देत माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अजित अडसूल आणि उषा अडसुळ यांचे आभअर मानले.
तर मोटीव्हेशन स्पिलर डॉक्टर राकेश सोमानी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शना बेसलाईन ते बेंचमार्क हा प्रवास आपल्याला करायचा आहे, असा महत्त्वाचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी केवळ त्यांच्या वर्तमान क्षमतेवर समाधानी न राहता, सतत प्रयत्न करून, शिक्षणामध्ये आणि पुढील करिअरमध्ये उत्कृष्टता गाठण्याचे ध्येय ठेवले पाहिजे, असे सांगितले.
या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे.एम.म्हात्रे, मोटीवेश्नल स्कीपर डॉ. राकेश सोमाणी, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, समीर कदम, माजी नगरसेवक नरेश ठाकूर, उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष संतोष शर्मा, महिला मोर्चाच्या खारघर शहर अध्यक्षा साधना पवार, खारघर शहर मंडळ उपाध्यक्ष संजय घरत, अजित अडसुळ, उषा अडसुळ, शहर सरचिटणीस दीपक शिंदे, शहर सचीव फुलाजी ठाकूर, प्रभाग अध्यक्ष रामचंद्र पाटील, अजय माळी, तपासे सर, युवामोर्चाचे खारघर शहर अध्यक्ष नितेश पाटील, शुभ पाटील, नितेश कोळी, विकास हराळे, पंकज दाभोळे, सुनील पाठक, क्रिश माने, रमाकांत म्हात्रे आदी उपस्थित होते.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper