Breaking News

विद्यालयास ग्रंथांची अनमोल भेट

पनवेल ः वार्ताहर

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ज्ञानवसा संवर्धित करण्यासाठी, विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीस चालना देण्यासाठी तसेच ऑनलाइन शिक्षणाचे दुष्परिणाम कमी करण्याचा प्रयत्न म्हणून गुळसुंदे येथील कु. गार्गी रेवती वसंत सोमण यांनी विद्यालयास ग्रंथभेट दिली.

आत्मचरित्रे, प्रवासवर्णने, कथासंग्रह, कादंबरी अशा विविध विषयांवरील सुमारे सात हजार रुपयांची मराठी आणि इंग्रजी भाषांतील 100 पुस्तके विद्यालयास भेट देण्यात आली. या ग्रंथसंपदेमुळे विद्यार्थ्यांमधील वाचन आवड नक्कीच वृद्धिंगत होईल, असा विश्वास विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका समिता सोमण यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply