उरण : वार्ताहर
उरण तालुक्यातील पाले गावातील काही भागांमध्ये विजेच्या समस्या आहेत. त्याकडे विद्युत महावितरणाने गांभीर्याने लक्ष द्यावे व समस्या सोडवाव्या, अशा आशयाचे निवेदन भाजप चिरनेर जिल्हा परिषद युवा चिटणीस पंकेश बाळकृष्ण म्हात्रे यांनी मंगळवारी (दि. 23) महावितरणास दिले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, पाले काही भागांमध्ये विद्युत खांबामधील अंतर जास्त आहे. त्यामुळे संबधित नागरिकांना अंधारातून जावे लागते. ही समस्या दूर कण्यासाठी 10 नवीन विद्युत खांब बसवावेत. त्याचप्रमाणे विद्युत वाहक (तारा) व्यवस्थित कराव्यात, असे निवेदन अभियंता महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण उरण विभागाचे कनिष्ठ अभियंता महेश जाधव कनिष्ठ अभियंता देण्यात आले आहे. या वेळी भाजप चिरनेर जिल्हा परिषद युवा चिटणीस पंकेश म्हात्रे, पाले गाव अध्यक्ष अमित म्हात्रे, पाले युवा उपाध्यक्ष प्रदीप म्हात्रे, प्रणय म्हात्रे उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper