Breaking News

विधान परिषद निवडणूक होणार बिनविरोध

मुंबई : राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोर्‍हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, तर काँग्रेसकडून जालन्याचे युवा कार्यकर्ते राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने या निवडणुकीत एकच उमेदवार दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होत असून, भाजपने चार उमेदवार देऊन ही निवडणूक बिनविरोध करायची की मतदान घ्यायचे याचा चेंडू महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कोर्टात टोलावला होता. काँग्रेसने एकच उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक अखेर बिनविरोध होणार आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply