नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत मिळविलेल्या यशाचे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने कौतुक केले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीतील स्थान न्यूझीलंडने पक्के केले असून त्या पार्श्वभूमीवर अंतिम फेरीत कोणत्या संघाविरुद्ध खेळायला आवडेल असे विचारले असता विल्यम्सन म्हणाला की, भारत, इंग्लंड हे दोघेही एकमेकांच्या तोडीस तोड असून, ऑस्ट्रेलियाचा संघही अद्याप पूर्णपणे अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. त्यामुळे मी आताच एखाद्या संघाची निवड करू इच्छित नाही, मात्र भारताने जवळपास दुसर्या फळीच्या खेळाडूंसह ऑस्ट्रेलियात मिळवलेल्या यशाने त्यांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला असेल. त्यामुळे इंग्लंडला या मालिकेत कठोर परिश्रम घ्यावे लागतील.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper