Breaking News

विवाहितेचा छळ; महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

महाड : प्रतिनिधी

तालुक्यातील कांबळे तर्फे बिरवाडी येथील एका विवाहित महिलेने हुंड्यासाठी छळ केला जात असल्याची तक्रार केल्यानंतर महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात   पीडित महिलेचा पतीसह सासू-सासरे व अन्य लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांबळे तर्फे बिरवाडी येथील चोवीस वर्षीय विवाहीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्याने तसेच माहेरुन पैसे आणण्यासाठी पतीसह सासू, सासरे, मावस सासू, नणंद यांच्याकडून शारीरिक तसेच मानसिक छळ केला जात होता. पीडित महिलेचे वडील नथुराम दत्तात्रय मोरे यांनादेखील सासरच्या मंडळींनी शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली होती.

या प्रकरणी पीडित महिलेचा पती सुमित सुनील देशमुख याच्यासह सुनील खंडेराय देशमुख (वय 53), सुनिता सुनील देशमुख (वय 50), सिंधुबाई गेनबा पवार, सपना नारायण कोकाटे यांच्यावर महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात भादवि कलम 498 अ, 352, 323, 324, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply