उरण : वार्ताहर
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गुरुवारी (दि. 3) उरण तालुक्यातील माऊली अपंग संघटना यांच्या वतीने अनेक समस्यांविषयी उरणचे नायब तहसीलदार पेढवी यांना निवेदन दिले. संस्थापक अध्यक्ष महादेव पाटील यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, सरकार मान्य स्वस्त दुकानात अपंगांना अंत्योदय रेशन कार्ड प्रमाणे धान्य मिळावे, त्याप्रमाणे उरण तहसील कार्यालयातून अंत्योदय रेशन कार्ड मिळावे त्याचप्रमाणे ज्यांनी ते मिळण्यासाठी उरण तहसील कार्यालयात अर्ज केले आहेत त्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर कार्ड देण्यात यावेत. तालुक्यातील ग्रामपंचायत व रेशन दुकानात अपंग व्यक्तींना लाभार्थी म्हणून पत्र उरण तहसील कार्यालयातून देण्यात यावे. अशा विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले. या वेळी माऊली अपंग संघटना संस्थापक अध्यक्ष महादेव रामदास पाटील, महेंद्र म्हात्रे, प्रतीक्षा घरत, रनिता ठाकूर, राजेश भोईर, बाळनाथ गावंड, हिरा ठाकूर, उमा कोळी, प्रा. राजेंद्र मढवी आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper