पनवेल : कर्नाळा बँकेचे चेअरमन, शेकापचे नेते व माजी आमदार विवेक पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम सहा दिवसांनी वाढलाय. न्यायालयाने विवेक पाटलांच्या कोठडीत 27 ऑक्टोबरपर्यंत वाढ केलीये. कर्नाळा बँक घोटाळ्याची सुनावणी गुरुवारी (दि. 21) होती. या वेळी विवेक पाटलांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आली. विशेष सरकारी वकील वेणेगावकर यांनी ‘ईडी’ची बाजू न्यायालयात मांडली. त्यांची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी स्थगित केली. या प्रकरणी पुढील सुनावणी 27 ऑक्टोबरला होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. विवेक पाटलांनी केलेल्या घोटाळ्याचा त्रास कर्नाळा बँकेच्या ज्या खातेधारकांना झाला आहे ते खातेदारही आपण गुंतवलेले पैसे दिवाळीपूर्वी तरी परत मिळतील या आशेवर आहेत.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper