
मुरूड : प्रतिनिधी
विश्व हिंदू परिषदेतर्फे मुरूडनजीकच्या तेलवडे आदिवासीवाडीमध्ये गुरुवारी (दि. 4) फराळ वाटपाच्या निमित्ताने तेथील आदिवासी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
विहिंपचे तालुका अध्यक्ष दिलीप दांडेकर, दिलीप जोशी, अशोक दिवेकर, दतात्रय गायकवाड, ॠषीकांत दांडेकर, वावडुंगीचे माजी सरपंच अजित कासार, मेघराज जाधव यांनी श्री भोगेश्वर मंदिरात फराळाचे संकलन करून तेलवडे येथील समाज मंदिरात त्याचे आदिवासी कुटुंबीयांना वाटप केले. या वेळी त्यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधत अभीष्टचिंतन केले. हा उपक्रम दरवर्षी राबवत असल्याचे दिलीप दांडेकर यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper