Breaking News

विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचार्‍याचा मृत्यू

खामगाव ः प्रतिनिधी
राज्यात सुरू असणार्‍या एसटी संपादरम्यान विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या कर्मचार्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विशाल अंबलकर (वय 31, रा. माटरगाव, ता. शेगाव) असे या दुर्दैवी कर्मचार्‍याचे नाव आहे.
खामगाव एसटी आगारात सहाय्यक मेकॅनिकल म्हणून काम करणार्‍या विशालने 16 नोव्हेंबर रोजी नैराश्येतून आपल्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याला उपचारासाठी तातडीने खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती खालावत असल्याने नंतर त्याला अकोला येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले होते. दोन दिवस त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. अखेर बुधवारी (दि. 17) रात्री नऊच्या सुमारास त्याची मृत्यूशी सुरू असणारी झुंज अपयशी ठरली. यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील एसटी कर्मचार्‍यांनी विशालच्या मृत्यूनंतर दु:ख व्यक्त करतानाच शासनाविरोधात संतापही व्यक्त केला आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply