रोहे : प्रतिनिधी
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी नुकताच किल्ला-रोहा येथील कृषि विज्ञान केंद्राला भेट देऊन तेथील कार्याची पहाणी केली.
कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. मनोज तलाठी यांनी डॉ. संजय भावे यांचे स्वागत केले व प्रक्षेत्रावर कार्यरत असलेल्या व कृषि विज्ञान केंद्राच्या इतर विस्तार विषयक कार्यक्रमाबाबत सविस्तार माहिती दिली. या भेटी दरम्यान डॉ. संजय भावे यांनी कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ जीवन आरेकर,
डॉ. राजेश मांजरेकर, सुधाकर पाध्ये, प्रक्षेत्र व्यवस्थापन प्रमोद यलमार, सचिन कार्ले यांच्याशी चर्चा करून विभाग निहाय कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रक्षेत्रावरील आंबा, नारळ, भाजीपाला पिकांच्या रोपवाटीकेला व लागवडीला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर शेळी पालन युनिट, कुक्कुटपालन युनिट यांची पाहणी करून त्याबाबत समाधान व्यक्त केले. दुपारच्या सत्रात डॉ. संजय भावे यांनी कृषि विज्ञान केंद्राने राबविलेल्या प्रथमदर्शीय पिक प्रात्यक्षिके तसेच यशवंतखार येथील हेमंत ठाकूर यांच्या प्रक्षेत्राची पाहणी करून तेथील कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, आंबा छाटणी प्रक्षेत्र, वराहपालन, राईस मिल, शेळीपालन अशा विविध युनिटला भेट दिली.
कोकण कृषि विद्यापीठ तसेच किल्ला-रोहा येथील कृषि विज्ञान केंद्र सदैव शेतकर्यांकरीता आहे, त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊन शेतकर्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे.
-डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक,
कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
RamPrahar – The Panvel Daily Paper