Breaking News

वीजचोरांवर गुन्हे दाखल; कर्जत तालुक्यात महावितरणची कारवाई

कर्जत : प्रतिनिधी

महावितरणने वीजचोरीप्रकरणी कर्जत तालुक्यामध्ये धडक मोहीम राबविली असून, तालुक्यातील पाच वीजचोरट्यांवर कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महावितरणचे कर्जत येथील उपकार्यकारी अभियंता आनंद घुले यांच्या मार्गदर्शनाखाली वीज कर्मचार्‍यांनी वीजचोरीप्रकरणी  धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत चंद्रकांत खंडू ठाकरे(रा. तिवरे), जगदिश अण्णा पवार (रा. सापले), राजेंद्र रघुनाथ शेळके (रा. तांबस), दीपक बाळाराम पवार (रा. सापेले), किशोर भानुदास लोंगले (रा. उमरोली) अशा पाच जणांनी महावितरणच्या एलटी लाइनवर आकडा टाकून घरातील बोर्डात थेट कनेक्शन घेतले असल्याचे आढळून आले. त्यांनी एकूण 74 हजार 770 रुपयांची वीजचोरी केली आहे. दरम्यान, या पाच जणांविरोधात महावितरणचे कनिष्ठ अभियंता वैभव डफळ यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply