
उरण : वार्ताहर
पावसाला सुरुवात होण्यास थोडेच महिने राहिले असून पावसाळ्यापूर्वी रस्त्यालगत व विद्युत खांबांवर व विजेच्या खांबांवर आलेल्या व वाढलेल्या झाडाच्या फांद्या छाटण्याचे काम उरण शहरात त्याचप्रमाणे ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू झाले आहे. नागरिकांनी या कामात सहकार्य करावे, अशी विनंती वीजवितरण कंपनी सहाय्यक अभियंता यांनी केली आहे.
पावसाळ्यात सर्वत्र वादळी हवामान असते. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा अशा वेळी वीज वाहून नेणार्या तारांजवळ असलेली झाडे, झाडाच्या फांद्या तारेवर पडून मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते. ते होऊ नये त्या करिता दरवर्षी उरण शहर व ग्रामीण भागात वीज मंडळाकडून वृक्षछाटणी केली जाते. आजपासून उरण शहरात उरण ते मोरा रोड या रस्त्यावर वृक्षछाटणीचे काम सुरू झाले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper