Breaking News

वृक्षलागवडीत सर्वांचे योगदान महत्त्वाचे- बीडीओ एन. प्रभे

माणगाव ः प्रतिनिधी

वृक्षलागवडीत विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन. प्रभे यांनी केले. तळेगावतर्फे गोरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असणार्‍या रेपोली राजिप. शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी पं. स. कृषी अधिकारी बाळकृष्ण काप, श्री. कटरे, श्री. लवटे, अशोक माडकर, ग्रा. पं. विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड, विनोद मिंडे, तळेगावतर्फे गोरेगाव सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक नरेंद्र घाडगे, पोलीस पाटील श्री. मोरे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. महाले, ग्रामस्थ श्री. जांभरे, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी गट विकास अधिकारी व संबंधित व पंचायत समिती अधिकारी ग्रामस्थांनी रेपोली संभाव्य दरडग्रस्त गावाची पाहणी केली. ग्रामपंचायतीला शासनाकडून 800 बाबूंची रोपे दिली असल्याचे प्रभे यांनी सांगितले. या वेळी बदाम, अशोक, निव, पेरू, चिकू यासारख्या वृक्षांची लागवडही करण्यात आली. कृषी अधिकारी बाळकृष्ण काप यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगितले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply