Breaking News

शक्ती-तुरा स्पर्धा साहित्य संघ येथे उत्साहात साजरी

मुंबई : रामप्रहर वृत्त

श्रीवर्धन मतदारसंघातील शक्ती-तुरा या पारंपरिक नाच मंडळाच्या स्पर्धा साहित्य संघ मंदिर, गिरगाव मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन लक्ष्मी नारायण नृत्य कलापथकाचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. या नृत्य स्पर्धेत श्रीवर्धन मतदारसंघातील एकूण 15 नामवंत नाच मंडळाने सहभाग घेतला होता. कोकणातील गौरी-गणपती निमित्ताने अनेक गणेशोत्सव मंडळे पूर्वतयारी करतात. त्यांच्यासाठी एक उत्तम व्यासपीठ श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष श्री कृष्णा कोबनाक यांच्या प्रयत्नाने मिळवून देण्यात आले. श्रीवर्धन मतदारसंघातील भाजप नेते कृष्णा कोबनाक हे नेहमीच कलेला वाव देत असतात. कोकणातील पारंपरिक कलेचे संवर्धन व्हावे यासाठी ते अशा स्पर्धांच्या आयोजनातून स्पर्धकांना प्रोत्साहन देण्याचे काम देखील करतात. त्यामुळेच सर्व रसिकप्रेमींची कृष्णा कोबनाक यांना नेहमीच पसंती असते.

कोकणात अनेक ठिकाणी या पारंपरिक शक्ती-तुरा नाचाचे अनेक मंडळात आयोजन करण्यात येते. त्या सर्व मंडळांसाठी या नृत्य स्पर्धेची एक पर्वणीच साहित्य संघात रसिकांना अनुभवता आली, तसेच आयोजक विनोद मानकर व त्यांचे मंडळ लक्ष्मीनारायण नृत्य कलापथक, मांदाड, तळा तालुका यांनी या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले. या स्पर्धेत सर्व सहभागी संघांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आले. समालोचक पांडुरंग पाटील, रमाकांत चुनेकर, जनार्दन पाटील, निरीक्षक म्हणून नामवंत कोकण भूषण शाहीर तुकाराम मानकर, अ‍ॅड. यशवंत साधू, अनंत गायकवाड, भालचंद्र दामाद, महादेव भाने, अशोक पाटील, शंकर भारदे गुरुजी व अन्य ढोलकीपटू यांनी या नृत्यस्पर्धेचे उत्तम काम पाहिले, तसेच या स्पर्धेत प्रथम क्रमांक रंगदेवता नाच मंडळ, मांदाड, ता. तळा या मंडळाने पटकावला. दुसरा क्रमांक अबाजी नृत्य पथक, तर तिसरा क्रमांक रोहिणी नृत्य पथक ता. म्हसळा यांनी पटकावला. सर्व विजेत्या मंडळांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. श्रीवर्धन मतदारसंघातील श्रीवर्धन, तळा, रोहा, माणगाव, रोहा व म्हसळा तालुक्यातील नाच मंडळाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. सर्व विजेत्या नृत्य मंडळांना कृष्णा कोबनाक व उपस्थित ज्येष्ठ पदाधिकारी, निरीक्षक यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, कोळी महासंघाचे नेते, आमदार रमेश पाटील यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले. आयोजक विनोद मानकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply