फलटण : आज निवडणूक समोर असताना काँग्रेस नेते राहुल गांधींना ठाऊक आहे की काँग्रेस हरणार. त्यामुळे ते बँकॉकला फिरायला निघून गेले आहेत, तर शरद पवारांची अवस्था शोले सिनेमातील जेलरसारखी झाली आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी बचे मेरे पिछे आओ, असे पवार म्हणत आहेत. प्रत्यक्षात त्यांच्यामागे कुणीही नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ते गुरुवारी (दि. 10) फलटण येथे झालेल्या सभेत बोलत होते. आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे कौतुक केले.

RamPrahar – The Panvel Daily Paper