नवी दिल्ली ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (दि. 3) दिल्लीत देशाचे गृहमंत्री आणि पहिले केंद्रिय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या संदर्भात पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनदेखील माहिती दिली. ही भेट नेमकी कशासाठी घेतली याविषयी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. ‘सर्वप्रथम मी अमित शाह यांचे देशाचे पहिले सहकारमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले. या भेटीदरम्यान, आम्ही देशातील साखर उद्योगाची परिस्थिती आणि साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे निर्माण होणार्या समस्या यावर चर्चा केली,’ असे पवारांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper