Breaking News

शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन निबंध स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रत्यक्ष जून महिन्यातील शैक्षणिक वर्ष आता सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा असून मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्हीपैकी कोणत्याही भाषेत सहभाग घेता येणार आहे. इयत्ता आठवी ते दहावी या मोठ्या गटासाठी एक हजार ते 1500, तर इयत्ता पाचवी ते सातवी या छोट्या गटासाठी 500 ते 700 शब्दांची मर्यादा  आहे. ’सुट्टीमध्ये मी घालवलेला अविस्मरणीय दिवस’, ’ओढ शाळेच्या पहिल्या दिवसाची’, ’हो! मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय’ हे तीन विषय या स्पर्धेकरिता असून निबंध पाठविण्याची अंतिम तारीख 20 जून आहे.
सर्व स्पर्धकांना ऑनलाइन सर्टिफिकेट देण्यात येणार असून विजेत्यांना भरघोस बक्षिसांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा तसेच निबंध 9920765765 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply