Breaking News

शाळेच्या बसला अपघात

सुदैवाने कोणतीही हानी नाही

खोपोली : प्रतिनिधी

खोपोली परिसरातील विद्यार्थ्यांना लोधिवली येथील अंबानी स्कूलमध्ये घेऊन जाणार्‍या बसला अपघात झाला. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. खोपोली, कर्जत, पनवेल, रसायनी, चौक या परिसरातून लोधिवली येथील अंबानी स्कूलमध्ये विद्यार्थी येत असतात. त्यासाठी खासगी बसचा वापर केला जातो. शहेशा या खासगी ट्रान्सपोर्टची बस (एमएच-46, एएच-7806) सकाळी खोपोली येथून विद्यार्थ्यांना घेऊन लोधिवलीकडे येत होती. चौक हद्दीत या बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनास धडक दिली. या अपघातात बसचालक व विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत, तसेच बसच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे.

Check Also

‘कॅपिटॉल’ची इमारत 98 वर्षांची झाली…

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकावर उतरून बाहेर पडणार्‍या आजच्या जेन झी पिढीतील काही जण पलिकडच्या फूटपाथवरील …

Leave a Reply