शिक्षणासारखे दुसरे पवित्र कार्य नाही -आमदार प्रशांत ठाकूर

पाले खुर्द जि.प. शाळेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
जेव्हा शिक्षणासाठी एखादी वास्तू उभी राहते, तेव्हा त्यातून केवळ इमारत उभी राहत नाही, तर पिढ्यान् पिढ्या सुशिक्षित होऊन तेथील सर्वांगीण उत्कर्षाची नवी दिशा निश्चित केली जाते. म्हणूनच शिक्षण देण्यासारखे दुसरे पवित्र कार्य नाही, असे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 7)
पनवेल तालुक्यातील पाले खुर्द येथे काढले.
दीपक फर्टीलायझर कंपनीच्या 42 लाख रुपयांच्या सीएसआर फंडातून पाले खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेची नूतन इमारत उभारण्यात येणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका अरुणा दाभणे आणि सागर भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले आहे. या शाळा इमारतीचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या समारंभास भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, एकनाथ देशेकर, कृष्णा पाटील, माजी जि.प. सदस्य अमित जाधव, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, माजी नगरसेवक गणेश कडू, रवींद्र भगत तसेच प्रकाश खैरे, सरस्वती काथारा, माजी सरपंच कमला देशेकर, वासुदेव पाटील, राम पाटील, महेश पाटील, अशोक पाटील, नकुल जोशी, विशाल खानावकर, अरविंद गोंधळी, कैलास मढवी, बाळू काटे, नवनाथ पाटील, नितेश पाटील, अंकुश ढोंबरे, दीपक फर्टीलायझर कंपनीचे अधिकारी श्री. काकडे, श्री. शिंदे, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, आपल्या उत्पन्नातील काही वाटा समाजासाठी खर्च करावा या उदात्त भावनेतून काम करणार्‍या संस्था आजच्या काळात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच उरल्या आहेत. यामध्ये दीपक फर्टिलायझर कंपनीचे योगदान अत्यंत मोठे आणि कौतुकास्पद आहे. या वेळी त्यांनी या शैक्षणिक कार्याला प्राथमिकता दिल्याबद्दल माजी नगरसेविका अरुणा दाभणे, सागर भोईर आणि दीपक फर्टीलायझर कंपनीचे आभार मानले.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply