कंटेनर चालकाचा मृत्यू
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
खोपोली-पेण रस्त्यावरील शिरवली गावाच्या हद्दीत असलेल्या हुतामाकी या पॅकेजिंग कंपनीच्या गेटवर विचित्र अपघात होऊन यात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. 16) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दवी घटना घडली.
कंपनीतून माल खाली करून वाहेर जाणार्या कंटेनर चालकाने आपली गाडी हुतामाकी कंपनीच्या दोन नंबर गेटवर तपासणीसाठी इंजिन चालू स्थितीत उभी केली होती. कंटेनरचालक महंमद सलमान रहीस खान (वय 23, रा. जिल्हा अमेठी, उत्तरप्रदेश) हा गाडी खाली उतरून गाडीच्या मागे जात कंटेनरचे दार उघडून वाँचमेनला तपासणीसाठी जात होता. याच दरम्यान कंटेनर पुढे आला व कंपनी गेट व कंटेनर यांच्यात चेपला व नंतर चिरडला जाऊन चालक महंमद याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती कंपनी व्यवस्थापनाकडून वावोशी सब स्टेशन पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी गेटवर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज बघून कलम 304 (अ) खाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास प्रक्रिया सुरू आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper