Breaking News

शिवजयंतीनिमित्त उलवे नोडमध्ये महाराष्ट्राची महासंस्कृती कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त येत्या बुधवारी (दि. 19) उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित मराठमोळा कलाविष्कार असलेला महाराष्ट्राची महासंस्कृती या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उलवे नोड सेक्टर 12मधील प्लॉट क्रमांक 6 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलजवळील या मैदानावर सायंकाळी 6 वाजता होणार्‍या या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा आमदार महेश बालदी, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, समितीचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, समितीचे सरचिटणीस व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
महाराष्ट्राची महासंस्कृतीमध्ये लोककला, लोकसंगीत, गणगवळणी, लावणी, अभंग, पोवाडा, बहुरंगी संगीत आणि नृत्यरचनांचा समावेश असून विशेषतः शिवराज्याभिषेक सोहळा सादर होणार आहे. या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply