पनवेल : रामप्रहर वृत्त : प्रियदर्शनी सांस्कृतिक व सामाजिक विकास मंडळ आणि देवी अंबामाता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती उत्सव अत्यंत उत्साहात झाला.
खांदा कॉलनी, सेक्टर 13 येथील अंबामाता मंदिराच्या प्रांगणात हा सोहळा झाला. या उत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर, भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग ब समिती सभापती संजय भोपी, नगरसेविका कुसुम पाटील, सीता पाटील आदींसह शिवप्रेमी नागरिक मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
यानिमित्त सकाळी शिवप्रतिमा पूजन झाले. नंतर माऊलीकृपा महिला भजन मंडळाचे भजन झाले. सायंकाळी सरगम प्रस्तुत गर्जा महाराष्ट्र माझा हा मराठमोळ्या गाण्यांचा करावके कार्यक्रम झाला. त्यामध्ये प्रसिद्ध गायक नरेश पाटील, अजय तेजे, शिवप्रसाद निकम, संविधा पाटकर, दया बाबरे आदींनी मराठमोळी गीते सादर केली.
संगीता थोरात यानी खुमासदार निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
RamPrahar – The Panvel Daily Paper