Breaking News

शिवतेज मित्र मंडळाचा माघी गणेशोत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेलमधील शिवतेज मित्र मंडळाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. रौप्यमहोत्सवी वर्षाला मंडळाच्यावतीने माघी गणेशोत्सवानिमीत्त सामाजिक उपक्रम आयोजित केले होते.

यामध्ये नवी मुंबई पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील यांच्या हस्ते कोरोना काळात कार्यरत असलेल्या डॉ. श्यामली कांबळे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच रायगड शिव सम्राटच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमांना नवी मुंबई परिमंडळ-2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक देविदास सोनावणे, नगरसेविका वृषाली वाघमारे, नगरसेवक मनोज भुजबळ, पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे जेष्ठ सल्लागार तथा दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर, जेष्ठ पत्रकार अरविंद पोतदार, संजय कदम, दिपक घोसाळकर, गणेश कोळी, सुधीर पाटील, अनिल कुरघोडे, नितीन देशमुख, विवेक पाटील, मंदार दोंदे, रफिक शेख आदी उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply