Breaking News

शिवनेरी आणि मारुती बॅलेनो कारची समोरासमोर धडक

सुदैवाने जीवितहानी टळली

पनवेल : वार्ताहर

पनवेल जवळील मुंबई गोवा महामार्गावर शिरढोण गावाच्या हद्दीत कैलास भवन हॉटेलसमोर भरधाव येणार्‍या शिवनेरी बस आणि मारुती बॅलेनो कारमध्ये समोरासमोर धडक झाल्याची घटना आज सकाळी 9 च्या दरम्यान घडली आहे. या धडकेत सुदैवाने जीवितहानी टळली आहे मात्र दोन्ही गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

मुंबई गोवा महामार्गाचे काँक्रेटीकरणाचे काम अनेक ठिकाणी सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी एकेरी मार्गावरून वाहतूक सुरु करण्यात आली आहे. याप्रकारे शिरढोण परिसरात एकेरी मार्गावरून वाहतूक सुरु आहे. यामध्ये बोरिवली ते दापोली वाहतूक करणार्‍या शिवनेरी बस पेण ते पनवेल मार्गावर जात असताना शिरढोण गावाच्या हद्दीत कैलास भवन हॉटेलसमोर अचानक समोरून येणार्‍या मारुती बॅलेनो कार क्र (एमएच 06 बीयु 0564) ची एकमेकांना जोरात धडक बसली. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply