Breaking News

शेकापला हादरा; भाजपमध्ये पक्षप्रवेश सुरूच

उलवे नोडमधील कार्यकर्ते भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षामध्ये दिवसेंदिवस पक्षप्रवेशाचे प्रमाण हे वाढताना दिसून येत आहे. त्याअंतर्गत भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास कोडरू यांच्या नेतृत्वाखाली उलवे नोड येथील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये मंगळवारी जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. कामोठे येथील भाजप कार्यालयामध्ये झालेल्या या पक्ष प्रवेशाच्या वेळी शेकापचे नाजीर शेख, वजीर मुल्लानी, राज मोमत, सय्यद हल्ली, यममुत्लीफ शेख, समसुदिन शेख, मोहम्मद इब्राहिम, मोहम्मद हानिफ, नाझीर अहमद, अल्लाउद्दीन ईस्माइल यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, के. के. म्हात्रे, भाजप नेते सुधाकर पाटील, राजेश म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply