Breaking News

शेणवईत कृषिदूतांकडून स्वच्छता मोहीम

रोहा : प्रतिनिधी 

दापोली कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण विकास कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत किल्ला रोहा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली शेणवई गावात स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीसंदर्भात जनजागृती केली. शेणवई प्राथमिक शाळेत महात्मा गांधी जयंती साजरी करून विद्यार्थ्यांसह प्रभात फेरी काढूनप्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यात आला. या वेळी गटप्रमुख  आशुतोष माने, हृषीकेश गोडसे, हेमंत सावंत, विशाल कदम तसेच शाळेचे मुख्याध्यापक विजय वेळे, ग्रामसेविका प्राजक्ता वारांगे सहभागी होते.

Check Also

शिवसेनेच्या सोनल घरत यांचा अर्ज मागे

भाजप महायुतीच्या उमेदवार जिज्ञासा किशोर कोळी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत …

Leave a Reply