Breaking News

शेतकर्यांना न्याय मिळवून द्या!

धेरंड, शहापुरातील शेतकर्‍यांचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना साकडे

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्यातील धेरंड, शहापूर गावातील शेतकर्‍याच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. याबाबत विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात आवाज उठवावा, या शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने  विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना केली आहे. टाटा पॉवर प्रकल्पाकरिता 2008 पासून 1200 एकर जमीन संपादन केली. त्याला 11 वर्ष झाली. या ठिकाणी कोणताही प्रकल्प आला नाही. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने (एमआयडीसी)  त्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. याठिकाणी नोकर्‍या, रोजगाराची स्वप्ने दाखविण्यात आली, परंतु 11 वर्षात काहीही घडलेले नाही आणि आता एमआयडीसीने पुन्हा धेरंड, शहापूर गावातील 1800 एकर जमीन नव्याने संपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याबबत न्याय मिळावा, म्हणून भूमिपुत्र न्याय हक्क संघटनेने निवेदन दिले होते. भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते प्रवीण  दरेकर यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली. आधी संपादन केलेल्या जमिनीवर प्रकल्प आलेला नाही. आता नव्याने जमीन संपादित केली जात आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. याबाबत आपण सभागृहात आवाज उठवावा, अशी विनंती यावेळी प्रवीण दरेकर यांना करण्यात आली.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply