उरण : बातमीदार
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र व मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने पेंधर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 64 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांची लागवडही करण्यात आली.या वेळी पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे, खजिनदार शैलेश ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष सुनील भोईर, सदस्य योगेश पगडे, तसेच मुंबई वेस्ट मॅनेजमेंटतर्फे प्रोजेक्ट प्रमुख सोमनाथ मलधर, एचआर महेंद्र शहाणे, सतेज धीवर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper