
खारघर : पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती, नगरसेवक प्रविण काळूराम पाटील यांच्या संकल्पनेतून शनिवारी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 2019 हे वर्ष खारघर गावासाठी अतिशय दु:खदायक ठरले. वर्षभरात गावातील एकूण 15 व्यक्तींचे निधन झाले असून, त्यातील बर्याच व्यक्तींचे मृत्यू हे अकस्मात झाले. त्यामुळे या श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाटील यांच्या संकल्पनेची गावातील ग्रामस्थांनी प्रशंसा केली. या वेळी कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper