Breaking News

श्रीमद्भगवदगीता पठण स्पर्धेची रविवारी प्राथमिक फेरी

पनवेलमध्ये प्रथमच आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका, संस्कार भारती पनवेल महानगर, संस्कृत भारती पनवेल आणि श्री गुरूकुलम न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद्भगवदगीता पठण स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवारी (दि. 16) विभागनिहाय पनवेल, नवीन पनवेल, कामोठे आणि खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले आहे.
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होणार्‍या या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. सकाळी 9 ते दुपारी वाजेपर्यंत होणारी ही प्राथमिक फेरी शालेय आणि खुला अशा दोन गटात होणार आहे. शालेय गट फेरी पनवेलमधील लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय, नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालय, कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, तर खुल्या गटातील फेरी खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात होणार आहे.
स्पर्धा प्रथम प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा टप्प्यात घेण्यात येणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार असून विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply