पनवेल तालुक्यात महायुतीची प्रचार रॅली
पनवेल : रामप्रहर वृत्त
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात मंगळवारी (दि. 16) प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
खासदार व महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि सिडकोे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला शेडुंग फाटा येथून दमदार सुरुवात झाली. पुढे भिंगार, सांगडे, बेलवली, वारदोली फाटा, लोणीवली, पाली-वांगणी, नेरे, कोप्रोली, विहिघर, चिपळे फाटा आदी गावांतून मार्गक्रमण करीत ही रॅली गावोगावी फिरली. या वेळी खासदार बारणे यांनी ठिकठिकाणच्या ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. महिलांनी औक्षण करून मान्यवरांचे स्वागत केले, तर कार्यकर्त्यांनी श्रीरंग बारणे आगे बढो हम तुम्हारे साथ है, महायुतीचा विजय असो अशा घोषणा दिल्या.
या रॅलीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सल्लागार बबन पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, भाजपचे तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी सदस्य परेश पाटील, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, सदस्य राज पाटील, माजी सदस्य नीलेश पाटील, तसेच अनेश ढवळे, योगेश लहाने, अशोक पाटील, प्रमोद भिंगारकर, राजेश पाटील, वासुदेव गवते यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्रीरंग बारणे यांचा जोरदार प्रचार केला जात असून, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता बारणे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येते.
RamPrahar – The Panvel Daily Paper