श्रीवर्धन : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळात नादुरस्त झालेले श्रीवर्धन शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे नगर परिषदेने तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. शासनाने दिलेल्या निधीतून श्रीवर्धन नगर परिषदेने शहरात 72 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. त्यानंतर शहरात चोरीची एकही घटना घडली नव्हती. शहरात कुठेही वाहतूक कोंडी झाली तर त्याची माहिती पोलिसांना पोलीस ठाण्यामध्ये बसूनच कळत होती. मात्र 3 जून 2020 रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामध्ये सीसीटीव्ही कॅमेर्यांचे खांब व वायर्स चक्रीवादळामध्ये नादुरुस्त झाल्या. काही ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेर फुटले आहेत. दिड वर्ष पूर्ण होऊनदेखील श्रीवर्धन नगर परिषद सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper