
श्रीवर्धन : प्रतिनिधी
गृह विभागाच्या आदेशानुसार श्रीवर्धनमध्ये रविवारी (दि. 1)सकाळी पोलीस कर्मचार्यांनी पथसंचलन केले. श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव पवार, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, सहाय्यक निरीक्षक अली मुल्ला, उपनिरीक्षक खिरडे, पोलीस नाईक जयेंद्र पेडवी यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी या पथ संचलनात भाग घेतला होता. त्यांनी शहरातील वाणीआळी, शिवाजी चौक, बाजारपेठ, मोगल मोहल्ला, बागवान मशीद, पेशवे आळी, जोशी रुग्णालय, टिळक रोड परिसरात पथ संचलन केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper