दापोली ः रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दापोली येथील रयत शिक्षण संस्थेच्या आनंता पांडुरंग भोईर विद्यालयामध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि. 29) करण्यात आले होते. भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम करण्यात येत असतात. या अंतर्गत दापोली येथील रयतच्या आनंता पांडुरंग भोईर विद्यालयामध्ये शाळेत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले. या वेळी वडघर विभाग पंचायत समिती युवाध्यक्ष मच्छिंद्र कटेकर, बी. के. कटेकर, समीर कटेकर पंढरीनाथ दमडे, पाटनोलीचे प्रभाकर पाटील, अमोल गव्हाणकर, रोहिदास गोसावी, नकुल कटेकर, सचिन कटेकर, प्रकाश कटेकर, रोशन दमडे, मानघर सागर पाटील, लक्ष्मी गोसावी, ललिता कटेकर, सुषमा कटेकर, शीतल कटेकर, वत्सला गोसावी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper