Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून अर्पिता पाटीलला उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य

पनवेल : रामप्रहर वृत्त
वैद्यकीय शिक्षणासाठी पनवेल तालुक्यातील कोपर येथील अर्पिता राजेश पाटील या विद्यार्थिनीला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
हा धनादेश भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते अर्पिताकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वीय्य सहाय्यक हेमंत माने, तसेच अर्पिताचे वडील राजेश पाटील, आई सुजाता पाटील उपस्थित होते.
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात गेल्या तीन दशकपेक्षा जास्त वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उच्च शिक्षण घेणार्‍या आणि आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन स्वतःच्या पायावर उभे केले जाते.
अर्पिता पाटील ही खारघर येथील जी. डी.पोळ फाऊंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरेपी या वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणार आहे, त्या अनुषंगाने तिला आर्थिक मदतीची गरज होती. तिच्या पालकांनी केलेल्या विनंतीनुसार तिला आर्थिक मदत करण्यात आली.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply