Breaking News

संतापजनक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पुणे ः प्रतिनिधी
पुण्यात एका 14 वर्षीय मुलीवर आठ जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली असून, पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गावी जाण्यासाठी पुणे रेल्वेस्थानक येथे गेली होती. तेव्हा तेथील एका रिक्षाचालकाने तिला विश्वासात घेत रिक्षात बसवले आणि नंतर थेट एका खोलीत घेऊन गेला. तिथे तिच्यावर आठ जणांनी बलात्कार केला. यामध्ये सहा रिक्षाचालक आणि दोन रेल्वे कर्मचार्‍यांचा समावेश आहे. स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आठही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे, तसेच पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply