संत नरहरी महाराज जयंती उत्साहात

अलिबाग ः प्रतिनिधी

मुंबई अहिर सुवर्णकार महाकार्यकारिणीतर्फे संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती डिजिटल वेबनार गुगल मीटच्या माध्यमातून नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. मंगलाताई सिन्नरकर, मुंबई सुवर्णकार महाकार्यकारिणी अध्यक्ष प्रभाकर मोरे, मुंबई उपनगर येथील प्रकाश खरोटे, पुण्याहून नंदकुमार वडनेरे, उर्मिला पिंगळे या वेळी ऑनलाइन उपस्थित होते. मुंबई परिसर, ठाणे, नवी मुंबई तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील समाज बांधवांनी वेबनारच्या माध्यमातून घरबसल्या कार्यक्रमास हजेरी लावली.कार्यक्रमाची सुरुवात संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि देवा तुझा मी सोनार, या ध्वनिफीत अभंगवाणीने झाली. कार्यकारी अ‍ॅडमिन सुनील विभांडिक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply