Breaking News

संदीप पाटील यांचा सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
संदीप पाटील सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असतात त्यामुळे ते वयाच्या पन्नाशीनंतरही आणखी जोमाने आणि उमेदीने कार्यरत राहतील, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे केले. ते माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महिलांसाठी कबड्डी स्पर्धेवेळी बोलत होते.
या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक गणेश कडू, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, माजी उपमहापौर चारूशीला घरत, माजी नगरसेविका सुशीला घरत, वर्षा नाईक, भीमराव पोवार, विजय म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा पाटील, रवी नाईक, सूर्यकांत ठाकूर आदी उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, संदीप पाटील यांना खेळाची आवड आहे म्हणून त्यांचा फिटनेस चांगला आहे. खेळांना ते प्रोत्साहन देत असतात. सामाजिक कार्यात अग्रेसर राहून नागरिकांना सुविधा देणे, विविध योजना राबविणे हे त्यांचे काम सुरू असते. भविष्यात त्यांना आणखी जोमाने काम करायचे आहे आणि मोठे सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडावे अशी शुभेच्छा दिल्या.
माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात, ओम साई कलावंत मंडळाने माझ्या अनुपस्थितीत ही जिल्हास्तरीय कबड्डीची लिग स्पर्धा आयोजित केली. नागरिकांनी मला सामाजिक कार्याची संधी दिली त्यामुळे मी इथपर्यंत पोहचलो. भाजप आणि आमचे मार्गदर्शक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून आणखी उत्तरोत्तर प्रगती करता येईल, नागरिकांची कामे करता येतील असेही पाटील म्हणाले.
ही जिल्हास्तरीय लीग स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ओम साई कलावंत मंडळाने नितीन चोरघे, मयुर कदम, अभिजित दिवेकर, सुयोग पाटील, प्रमोद म्हामुणकर, मंगेश घरत आदींनी प्रयत्न केले तर या स्पर्धेत वृतिक्षा स्पोर्ट्स क्लब पेण, कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी पनवेल, दिलखुश क्रीडा मंडळ अलिबाग, श्री सुवर्ण गणेश दिवे आगार या संघांनी सहभाग घेतला.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply